• आंबुशी

    औषधी गुणधर्म
    कोकणात,अंबूशी पाण्यात वाटून,उकळून कांद्याबरोबर पित्तप्रकोपात डोक्यालालावतात. अंबूशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते. शरीरातील कफ व वातदोष वाढले असल्यास आंबुशीच्या भाजी चा आहरात समावेश करावा.


  • आघाडा

    औषधी गुणधर्म
    भूक वाढवणारी,वात,हृदयरोग,मूळव्याध,पोटदुखी जलोदर,अपचन,रक्तरोग,श्वासनलिका दाह इ.रोग व विकारांत उपयुक्त आहे. रातांधळेपणात आघाड्याच्या मुळीचे चूर्ण देतात.तसेचविंचूदंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात.


  • आंबाडा

    औषधी गुणधर्म
    संधिवातात,पित्तप्रकोप,व्रण,जळजळ,क्षय, रक्तस्राव,घसादुखी या विकारांवरआंबाड्याची फळे गुणकारी आहेत. कोवळ्या पानांचा रस कानदुखीत व कर्णस्रवात वापरतात. सालवाटून पाण्या बरोबर मिसळून सांध्यांच्या आणि स्नायुंच्या संधीवातात चोळतात.


  • कामोनी

    औषधी गुणधर्म
    कामोनी हि वनस्पती यकृत दोषावर उत्तम औषधी आहे.हृदय आणि डोळ्यांचे रोग,मुळव्याध,आमांश, दमा, वांती, ताप, ई. विकारांवर हि वनस्पती गुणकारी आहे. थुंकीतून रक्त पडत असल्यास व कफ ज्वरात कामोणीच्या पानांचा अंगरस देतात.ज्वर, जुलाब, नेत्ररोगांत फळाचा वापर करतात.


  • केना

    औषधी गुणधर्म
    ज्यांना पचनाच्या तक्रारी, मलावरोधाचा त्रास आहे, अशांणा या भाजीचा उपयोग केल्यास पोट साफ होऊन , पचन क्रिया निट होऊ लागते. त्वचाविकार,सूज आदी विकार या भाजीच्या नियमित वापराणे कमी होतात.


  • गुळवेळ

    औषधी गुणधर्म
    हि वनस्पती ताप, तहान, जळजळ ,वांती यावर उपयुक्त आहे. त्वचारोगात उपयोगी, मधुमेहवर उपयुक्त, संधीवातावर हि वनस्पती गुणकारी मानली जाते. हि वनस्पतीभूक लागणे, अन्नपचन,शक्ती वाढणे, पोटदुखी,खाज व दाह सर्दी, खोकला यावर गुणकारी आहे.