• पानओवा

    औषधी गुणधर्म
    या वनस्पतींचा गुरांना औषध म्हणून वापर करतात. अपचन,पोटदुखी,पोटशूळ या मध्ये एक,दोन पान दिल्यास त्वरित गुण येतो.दमा,जुनाट खोकला,फेपरे,भूक न लागणे,पोट गच्च होणे , पोट साफ न होणे , या रोगांवर या वनस्पतींचा उपयोग होतो.


  • मोरशेंड

    औषधी गुणधर्म
    संधिवात या आजारातया भाजीचा उपयोग होतो.या भाजीच्या सेवनाने रक्तातील युरीक अॅसिड चे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते. तरुणांतील गुप्तरोग व स्रियांमधील श्वेतप्रदर या विकारात मोरशेंद भाजीचा चांगला उपयोग होतो.


  • घोळ

    औषधी गुणधर्म
    घोळ हि भाजी खाल्यानि अल्सर होत नाही. मधुमेहहि कमी होतो, लाघवी साफ होण्यासाठी उपयोगी, लघवीची जळजळ,उन्हाळी लागणे, ,हातपायांची,डोळ्यांची होणारी जळजळ या भाजीने कमी होते. वाढलेला कफ व पित्तदोष कमी होतो.


  • टाकळा

    औषधी गुणधर्म
    टाकळाच्या पानांची भाजी खाल्लीतर तर शरीरातील कफदोष व वात कमी होण्यास मदत होते.पित्तज,हृदयविकार, श्वास,खोकला, या रोगांवर वर या पानांचा रस मधातून देतात.अॅलर्जी,सोरायसिस,खरुज,या सारखे त्वच्या विकार कमी होतात.


  • राजगिरा

    औषधी गुणधर्म
    त्वचेवर व्रण कमी, करण्यासाठीम राजगीरा च्या पानांचा वाटून लेप करतात. रक्तशुद्धीसाठी ,लघवीला जळजळ होत असल्यास राजगिरा पानांचा रस घेतात.


  • कांडवेल

    औषधी गुणधर्म
    नाकाचा घोळना फुटल्यास खोडाचा रस नाकात घालतात. तसेच कानात घालतात कंबर दुखीट कांडे ठेचून कंबरेवर बांधतात.हाड तुटलेले असल्यास कांडवेलीच्या रसात दुप्पट तूप धालून प्यावे.